You are currently viewing छत्रपतींच्या स्मारकाला स्क्रेनची धडक

छत्रपतींच्या स्मारकाला स्क्रेनची धडक

पालघरमध्ये चौकाची मोडतोड, तातडीने पुनर्बाधणी

चाररस्ता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाला रविवारी एका क्रेनने जोरदार धडक दिली. या धडकेत चौकाचे मोठे नुकसान झाले होते. मात्र हा चौक एका दिवसात पुन्हा उभारण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनोरच्या दिशेने येणाऱ्या क्रेनचा ब्रेक निकामी झाल्याने समोरून जाणाऱ्या वाहनचालकला वाचविण्यासाठी क्रेन चालकाने थेट चौकाला धडक दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच, या परिसरात रस्त्यालगत घरे असल्याने ही क्रेन त्या घरांमध्ये शिरण्याची दाट शक्यता होती. मात्र प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.

शिवजयंती तोंडावर आलेली असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकची अशी मोडतोड झाल्याने या परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

मात्र नगरपरिषद पदाधिकारी व प्रशासन यांनी ही परिस्थिती हाताळल्याने वातावरण शांत झाले. क्रेन मालकाने चौक नव्याने बांधून देण्याची तयारी दाखवली व तात्काळ चौक बांधून दिला. पालघर शहरात सध्या वाहतुकीची समस्या खूप बिकट झाली असून सिग्नल यंत्रणा नसल्याने वाहने वाहतूक नियम पाळत नसल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. याकडे प्रशासनही गांभीर्याने पाहत नाही. पालघर शहरातील मुख्य चौकात नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात वाहतूक सिग्नल उभारण्याची गरज आहे. तसेच, अतिक्रमण दूर करण्याची मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा