स्नेह नागरी सहकारी पत संस्थेच्या २०२६ च्या कॅलेंडरचे अनावरण
सावंतवाडी
स्नेह नागरी सहकारी पत संस्थेचे नवीन वर्ष २०२६ चे कॅलेंडर नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. अनंत व्यंकटेश उचगावकर, संचालक श्री. सोमनाथ जिगजींनी, संचालक श्री. शिवकुमार अनंत उचगावकर, मुख्याधिकारी सौ. संगीता रवींद्र प्रभू तसेच वसुली अधिकारी श्री. रमेश निर्गुण उपस्थित होते. यावेळी संस्थेचे इतर कर्मचारी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॅलेंडर अनावरण प्रसंगी अध्यक्ष श्री. अनंत व्यंकटेश उचगावकर यांनी संस्थेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले व नवीन वर्षात सभासदांना अधिक चांगल्या व दर्जेदार सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम प्रसन्न वातावरणात पार पडला.
