कणकवली प्रतिनिधी
मुंबईची अवस्था पाकव्याप्त कश्मीरसारखी झाली असून मला या ठिकाणी राहण्याची भीती वाटत आहे.अशा आशयाचे वादग्रस्त विधान
करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन व पोस्टरला चप्पलाचा हार घालत शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने तसेच शिवसैनिकांच्या वतीने निषेध करण्यात आला. मुर्दा बाद मुर्दा बाद ‘कंगना’ मुर्दा बाद…!शिवसेनेचा विजय असो…! चले जाव.. चले जाव… पाक मे चले जावं… !अशा घोषणा देत कंगना विरोधात कारवाईची मागणी देखील करण्यात आली.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर छेडण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हा महिला संघटक नीलम सावंत-पालव,तालुका अध्यक्ष शैलेश भोगले, डॉ.प्रथमेश सावंत, नगसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, शहर प्रमुख शेखर राणे, राजू राणे, वैभव मालंडकर, नगरसेविका मानसी मुंज, मानसी वाळके, वैद्यही गुडेकर, साक्षी आमडोस्कर, संजना कोलते, तृप्ती कोरगावकर, राजू राणे, नेहा भोसले, वैजू कांबळे, भास्कर राणे, अनुप वारंग, विलास गुडेकर, ललित घाडीगावकर, रिमेश चव्हाण, किरण वर्दम, दामू सावंत, संतोष परब, संतोष गुरव, बाळू पारकर, निसार शेख, रुपेश आमडोस्कर, राजन म्हाडगूत, अजित काणेकर, सूरज सुतार आदी शिसवेना महिला पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या वादग्रस्त विधानामुळे सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ज्या मुंबईच्या जीवावर आपलं साम्राज्य उभं केलं. आणि आता त्याच मुंबईबद्दल असे बेजबाबदार पणे व्यक्तव्य म्हणजे कृतघ्नपणाचे लक्षण असल्याचे सांगत नीलम सावंत-पालव यांनी निषेध व्यक्त केला.