*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
*********
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १३१ वे
अध्याय – २१ वा , कविता – ५ वी
___________________________
हरी पाटला बरोबर । महाराज कुस्ती खेळले खरोखर ।
त्याच्या आव्हानास दिले उत्तर । निरुत्तर केले पाटलास ।।१।।
पाटील बंधूंनी त्रास दिला । स्वामींनी हाताने ऊस पिळला । तो रस पिण्यास दिला । गर्व दूर केला पाटील बंधूंचा ।।२।।
भिक्या नामे पुत्र दिला । खंडू पाटलाला । आम्र- भोजन करा-आदेश दिला । त्यास , स्वामींनी ।। ३।।
कथा असती या सप्तम अध्यायात.
देशमुख-पाटील दोघात भांडणे होती । कटकटी-मारामारी होती । एकमेकांना त्रास देती । सदा , हे दोघे ।। ४।।
एकावेळी देशमुखांना संधी मिळाली । त्यांनी पाटलाविरुद्ध
तक्रार केली । परिस्थिती बिकट ओढवली । पाटलावरी ।।५।।
समर्थांची कृपा झाली । निर्दोष सुटका पाटलाची झाली ।
भक्ती त्याची जडली । स्वामींच्या चरणी ।।६।।
कृष्णाजीच्या मळ्यात स्वामी आले । मंदिरा शेजारी छपरात
राहिले । ब्रह्मगिरी गोसावी आले । शिष्यासाहित ।।७।।
जळत्या पलंगाची घटना घडली । गोसाव्यास जाणीव झाली ।क्षमा त्याने मागितली । स्वामी गजाननाची ।।८।।
कथा या अष्टम अध्यातल्या..।
कथेकरी बुवाचा द्वाड घोडा शांत केला । नवस गांजाचा केला। परी जो विसरला । त्यास बोध केला , मेळ ठेवा बोलण्यात रे ।।९।।
दासनवमी उत्सवा भले । स्वामी बाळापुरा आले । रामदास-रूप दर्शन घडविले । बाळकृष्ण रामदासीला ।।१०।।
इति नवम अध्याय..
***********
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
__________________________
कवी अरुणदास ” अरुण वि. देशपांडे – पुणे.
___________________________
