आजगांव येथील रहिवासी सुलोचना पांढरे यांचे निधन
सावंतवाडी :
आजगांव येथील रहिवासी सुलोचना सदगुरु पांढरे ( वय ८२ ) यांचे गुरुवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, पुतणे, पुतण्या, सूना, नातवंडे, जाऊ, चुलत दिर असा परिवार आहे. आजगांवचे माजी सरपंच कै. सदगुरू उर्फ भाई पांढरे यांची ती पत्नी, किशोर, चंद्रहास व उदय यांची आई तर पत्रकार सचिन रेडकर यांच्या त्या मामी होत.
