बांदा उड्डाणपूल नजीक घटना सुदैवाने बँक कर्मचारी युवती वाचली.
बांदा
बांदा येथील उड्डाणपूल आशापुरी सिरॅमिक शॉप च्या समोर डिव्हायडर मधील आठ फूट मोठ्या खड्ड्यांमध्ये बँक कर्मचारी मनीषा मीना जयपुर राजस्थान 28 हि रस्त्याचा अंदाज चुकून आठ फूट खड्ड्यांमध्ये खाली पडली. ती सायंकाळी सात वाजता एका हॉटेल मधून जेवून रूम वर जाण्यासाठी रस्ता क्रॉस करत ही तेव्हा ही घटना घडली. खड्ड्यामध्ये पडल्यानंतर ती मोठमोठ्याने आरडाओरड करत होती मला वाचवा मला वाचवा परंतु तिचा आवाज कोणापर्यंतर हि पोहोचत नव्हता अखेर त्याच जखमी अवस्थेत तिने पर्स मधून मोबाईल काढून आपल्या बँक स्टाफच्या एका कर्मचाऱ्याला फोन करून बोलवून घेतले कर्मचारी तेथे लगेच आला परंतु घटनास्थळी त्या कर्मचाऱ्याला ती युती कुठे दिसेनाशी झाली होती तीला शोधण्यासाठी अवघे दहा मिनिटे लागली अखेर त्याने सहज म्हणून त्या खड्ड्यामध्ये टॉर्च मारून पाहिलं तेव्हा ती त्या खड्ड्यामध्ये पडलेली दिसली तेव्हा ती थोडीफार शुद्धीत होती त्यावेळी तेथील नागरिकांनी तिला लगेच बाहेर काढले व बांदा आरोग्य केंद्रामध्ये घेऊन गेले तिच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत असल्यामुळे अधिक उपचारासाठी तिला अमोल सावंत यांच्या प्रायव्हेट ॲम्बुलन्सने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रूपा मुद्राळे व रवी जाधव यांनी तीला उपचारासाठी पूर्ण सहकार्य केले. परंतु रस्त्यामध्ये असे खड्डे मारून ठेवल्यावर रात्रीच्या वेळी त्या खड्ड्यात पडून कोणाचातरी जीव जाऊ शकतो याचं हे उदाहरण आहे. तिचं नशीब चांगलं कि ती बेशुद्ध पडली नाही नाहीतर ती खड्ड्यामध्ये आहे हे कोणाला समजलं नसतं. प्रशासनाने याची दखल घेऊन असे जीवघेणे खड्डे त्वरित भरावे अशी विनंती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रवी जाधव यांनी केली आहे. याप्रसंगी रूपा मुद्राळे व त्यांचे स्टाफ मेंबर अमोल त्रिवेदी, मंगेश राठोड व राजेश कुमार जेना तिला धीर देण्यासाठी तिच्यासोबत आहेत .
