You are currently viewing जि.प.–पं.स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत शिवसेना संघटनात्मक तयारीला वेग

जि.प.–पं.स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत शिवसेना संघटनात्मक तयारीला वेग

जि.प.–पं.स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत शिवसेना संघटनात्मक तयारीला वेग

वेंगुर्ले

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने वेंगुर्ले तालुक्यात संघटनात्मक तयारीला गती दिली असून येत्या चार दिवसांत सक्षम तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे. संघटना अधिक मजबूत करून निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्धार असल्याची माहिती शिवसेना पक्ष निरीक्षक विद्याधर परब यांनी वेंगुर्ले येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
निवडणुका स्वबळावर की युतीत लढवायच्या याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरून होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, प्रभारी तालुकाप्रमुख सचिन देसाई, नवनिर्वाचित नगरसेविका लीना म्हापणकर, कोचरा सरपंच योगेश तेली यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन वालावलकर म्हणाले की, सावंतवाडी व वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकांमध्ये आमदार दिपक केसरकर व जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने प्रभावी कामगिरी केली असून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आगामी जि.प. व पं.स. निवडणुकांमध्येही शिवसेनेचे पदाधिकारी आमदार केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. तालुक्यात नव्याने संघटन बांधणी करून कार्यकर्त्यांना बळ देण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच वेंगुर्लावासीय नागरिकांचे आभार मानून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रभारी तालुकाप्रमुख सचिन देसाई यांनी पक्षशिस्त व संघटनात्मक मजबुतीवर भर देत सांगितले की, पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी तालुकास्तरावर दौरे सुरू करण्यात येणार आहेत. आगामी निवडणुकांपूर्वी तालुक्यात मजबूत संघटना उभी केली जाईल. आमदार दिपक केसरकर व आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षवाढीसाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा