You are currently viewing नववर्षारंभी घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून वनराई बंधारा उभारणी

नववर्षारंभी घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून वनराई बंधारा उभारणी

*नववर्षारंभी घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून वनराई बंधारा उभारणी*

पाणी अडवा, पाणी जिरवा चा दिला प्रभावी संदेश

बांदा

घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या स्काऊट-गाईड तसेच कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी ग्रामस्थ , माजी विद्यार्थी व पालकांच्या सहकार्याने घारपी उडेली येथे नववर्ष २०२६च्या प्रारंभी वनराई बंधारा उभारून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मोलाचा संदेश दिला.
‘पाणी म्हणजे जीवन’ असे म्हटले जाते. पाणी ही प्रत्येक सजीवासाठी अत्यावश्यक बाब असून पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे भूजल पातळी वाढतेच, शिवाय जंगलातील पशु-पक्ष्यांनाही उन्हाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध होते. या उद्देशाने विद्यार्थ्यांनी हा उपक्रम उत्साहाने राबविला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे. डी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे व स्वाती गावडे, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर, उपाध्यक्ष यशोदा गावडे, पोलिस पाटील समृद्धी गावडे, अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविटकर, संचिता सावंत, आशा सेविका उत्तरा नाईक तसेच सहदेव गावडे, लवू गावडे, हरिभाऊ गावडे, एकनाथ गावडे, महेश नाईक, तुकाराम गावडे, शरद गावडे, अजित अस्नोडकर, जानकी गावडे, स्मिता गावडे, रिया कविटकर, अंकिता गावडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा