*ओंजळीतील शब्दफुले समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पुष्पा कोल्हे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*संकल्प*
काही घडले, काही बिघडले, हरकत नाही आज्ञेशिवाय ‘त्याच्या’ क्षणही पुढे सरकत नाही
किती मिळवले किती गमावले हिशोब ठेवत नाही
पापाची आम्ही करू झाडणी पुण्यावाचुनी बरकत नाही
क्षण गेले, पळही गेले, सरले दिन, वर्षही सरले आयुष्याचा वेळ संपता प्राण कुडीमध्ये अडकत नाही
दुर्गुणांचे होळी करुनी गुणवत्तेची कास धरावी
सकारात्मक विचार करण्या काहीच हरकत नाही
झाले गेले गंगेस मिळाले चिंता, न करावी भविष्याची
वर्तमानात जगत असता, दु:ख- वेदना समजत नाही
‘माणूस माणूस जोडत राहू, मानवतेला जपूया सारे’
‘सौहार्दाची बोलू भाषा, हृदय प्रेमाने भरतच राहू!’
संकल्प हा नववर्षाचा, पूर्ण करण्यास्तव झटूया सारे
कृतीमधुनी देऊ दावुनी, व्यर्थ वल्गना बरळत नाही!
पुष्पा कोल्हे
चेंबूर, मुंबई७१
