सावंतवाडी नगरपालिकेत भाजप विजयी नगरसेवकांचा स्वतंत्र गट; श्रद्धा सावंत भोसले गटनेत्या
सावंतवाडी
नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या वतीने निवडणूक लढवून विजयी ठरलेल्या थेट नगराध्यक्षा आणि ११ नगरसेवकांनी आज स्वतंत्र गटाची औपचारिक घोषणा केली. गट स्थापनेचे अधिकृत पत्र जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.
या नव्या गटाच्या नेतृत्वाची जबाबदारी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोसले यांच्याकडे सर्वानुमते सोपवण्यात आली. भाजप पॅनलमधून निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये कोणतीही फूट पडू नये आणि एकत्रितपणा कायम राहावा, या राजकीय दक्षतेतून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नगराध्यक्षा भोसले यांच्यासह एकूण ११ नगरसेवकांचा समावेश असलेल्या या गटाने आगामी काळात नगरपालिकेतील विकासकामे समन्वयाने आणि एकजुटीने राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
