You are currently viewing भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत वेंगुर्लेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजन गिरप यांचे अभिनंदन !!!

भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत वेंगुर्लेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजन गिरप यांचे अभिनंदन !!!

*भाजपा दिव्यांग विकास आघाडीमार्फत वेंगुर्लेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजन गिरप यांचे अभिनंदन !!!*

वेंगुर्ले

वेंगुर्ले च्या नगराध्यक्ष पदी दुसर्‍यांदा विराजमान झालेले दिलीप उर्फ राजन गिरप यांचे अभिनंदन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केले .
यावेळी भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे सहसंयोजक श्यामसुंदर लोट व प्रकाश वाघ , भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , नवनिर्वाचित नगरसेवक सुधीर पालयेकर , सुनिल घाग , ललित गावडे , साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग च्या अध्यक्षा रुपाली पाटील , दिव्यांग विकास केंद्र – वेंगुर्ले च्या खजिनदार स्मिता गावडे उपस्थित होत्या .
यावेळी सत्कार प्रसंगी नगराध्यक्ष राजन गिरप यांनी भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे आभार मानुन , लवकरच वेंगुर्ले शहरातील दिव्यांगांचा मेळावा आयोजित करून , दिव्यांगा मधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केलेल्यांचा सत्कार सोहळा आयोजित करणार असल्याचे सांगीतले . तसेच शहरातील दिव्यांगांच्या समस्यांबाबत माहिती घेऊन त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी नगरपरिषद मार्फत प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले .
यावेळी भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी नगराध्यक्ष राजन गिरप यांनी दिव्यांगांबद्दल असलेली आत्मियता दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांचे अभिनंदन केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा