*”आम्ही लेखिका ” चा अभिजात मराठी साहित्य मेळावा संपन्न*
मिरारोड :
अनेक छोटया संमेलनांचाच पुढे मोठा मंच होतो. मी पासून आम्ही पर्यंतचा प्रवास म्हणजेच ” लेखिका ” हा जागतिक पातळीवरचा मंच आहे. दि. २७ डिसेंबर २०२५ शनिवारी संपन्न झालेल्या आम्ही लेखिका आणि स्वरसंगम आयोजित “अभिजात मराठी साहित्य मेळाव्यात” प्रा. सुनंदा पाटील – अध्यक्ष आम्ही लेखिका, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष या नात्याने बोलताना म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, फक्त चूल आणि मूल सांभाळणाऱ्या हातात लेखणीही तेवढीच शोभून दिसते. गृहिणी म्हणजे केवळ गृहीत धरली जाणारी स्त्री ही व्याख्या आता बदलायला हवी.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्या होत्या वसई येथील डॉ. पल्लवी परुळेकर बनसोडे. गृहिणींचे हात लिहिते झाल्याबद्दल ताईंनी आपल्या भाषणात समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमात “पाचवा कोपरा” – लेखिका प्रा. सुनंदा पाटील आणि “अंतर्नाद” लेखिका शिल्पा देवळेकर या दोन कथासंग्रहांचे प्रकाशन डॉ. पल्लवी परुळेकर बनसोडे आणि अनुवादक अक्षता देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात २०२४ या वर्षातील प्रकाशित महिलांचा विविध ग्रंथांना पुरस्कृत करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक अंजना कर्णिक यांचा या प्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संयोजक शिल्पा देवळेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आम्ही लेखिका केंद्रिय समिती सदस्य सुनिता बाफना डहाणू यांच्या अध्यक्षतेखाली कवायित्री संमेलन पार पडले. पूजा काळे आणि कल्पना उबाळे यांनी सूत्रसंचालन केले. तर ज्येष्ठ कवयित्री कल्पना म्हापूसकर यांनी आभारप्रदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ लेखिका नीला बर्वे या खास सिंगापूरहून आल्या होत्या. नागपूरच्या अदिती देशमुख, डॉ. शिल्पा जोशी, स्वाती नातू डॉ. चव्हाण, पुष्पा कोल्हे, प्रियदर्शिनी नाबर या व अशा अनेक आस्वादक लेखक / लेखिकांची या प्रसंगी उपस्थिती लक्षणीय होती.
