वेंगुर्ला पत्रकार संघातर्फे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचा सत्कार…
वेंगुर्ले
नगरपरिषद नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजन गिरप हे सलग दुसऱ्यांदा भाजपतर्फे निवडून आल्याबद्दल वेंगुर्ला तालुका पत्रकार संघातर्फे त्यांचा शाल पुष्पगुचछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष दिपेश परब, सचिव विनायक वारंग, उपाध्यक्ष योगेश तांडेल, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेंद्र मातोंडकर, माजी जिल्हा कार्यकारिणी उपाध्यक्ष दाजी नाईक, सदस्य भरत सातोसकर, प्रथमेश गुरव, अजय गडेकर, सीमा मराठे, माजी तालुकाध्यक्ष के. जी. गावडे आदी पत्रकार उपस्थित होते.
