You are currently viewing सावंतवाडी पोस्ट ऑफिसला स्वमालकीची नवी आलिशान इमारत; १ जानेवारीला उद्घाटन

सावंतवाडी पोस्ट ऑफिसला स्वमालकीची नवी आलिशान इमारत; १ जानेवारीला उद्घाटन

सावंतवाडी पोस्ट ऑफिसला स्वमालकीची नवी आलिशान इमारत; १ जानेवारीला उद्घाटन

सावंतवाडी

सावंतवाडी येथील पोस्ट ऑफिस आता स्वमालकीच्या नव्या आणि सुसज्ज इमारतीत कार्यान्वित होणार आहे. नगरपालिकेच्या उद्यानाच्या मागील जागेत उभारण्यात आलेल्या या आलिशान इमारतीचे उद्घाटन १ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे डाक अधीक्षक नंदकुमार कुरळपकर यांनी दिली.
आतापर्यंत सावंतवाडी पोस्ट ऑफिस जिमखाना मैदानाजवळील हरेश्वर कॉम्प्लेक्समध्ये भाडेतत्त्वावर सुरू होते. मात्र आता भाड्याच्या जागेऐवजी स्वतःच्या मालकीच्या इमारतीत स्थलांतर होत असल्याने पोस्ट ऑफिसच्या सेवांना अधिक सुविधा आणि प्रशस्त वातावरण मिळणार आहे.
नव्या इमारतीमुळे नागरिकांना पोस्टाच्या विविध सेवा अधिक सोयीस्करपणे आणि आधुनिक पद्धतीने उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा