You are currently viewing “स्वच्छ व सुंदर सावंतवाडी” मोहिमेला प्रारंभ;

“स्वच्छ व सुंदर सावंतवाडी” मोहिमेला प्रारंभ;

“स्वच्छ व सुंदर सावंतवाडी” मोहिमेला प्रारंभ; नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांचा स्वच्छतेवर भर

सावंतवाडी
सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपची सत्ता येताच नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी शहर स्वच्छ व सुंदर बनवण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली आहेत. सावंतवाडी शहर अधिक स्वच्छ, सुशोभित व नागरिकांसाठी आकर्षक दिसावे, यासाठी त्यांनी स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य दिले आहे.
तलावाच्या काठी बसणाऱ्या नागरिकांना स्वच्छ व सुंदर परिसर मिळावा, यासाठी तलाव परिसरातील फुटपाथ स्वच्छ धुऊन काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच नगरपरिषद क्षेत्रातील प्रत्येक वॉर्डमध्ये नियमित व प्रभावी स्वच्छता राबवावी, असे निर्देश नगरपरिषद स्वच्छता अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर आजपासून “स्वच्छ व सुंदर सावंतवाडी” या विशेष मोहिमेला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडून नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा