*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कॅलेंडर बदलले तरी…*
वार दिवस महिने
कॅलेंडरवर तेच असतात
वर्ष बदलल्याच्या
फक्त खुणा दिसतात…
आता बदलेल परिस्थिती
आशा लागते मनाला
सजग करते प्रत्येक पान
रोजच्याच जगण्याला…
काही चुका मागच्या
आता असावे सावधान
दूरदृष्टी बाळगत असता
काळजात हेच समाधान…
कमीत कमी फुल्या
नवीन दिनदर्शिकेवर
हिशोब पक्का ठेऊ या
टिपून नव्या पानावर….
नवीन काय करायचं
प्रत्येक व्यक्तीने ठरवावं
नववर्ष सुखाचे जावो
म्हणत भिंतीला अडकवावं….!!
::::::::::::::::::::::::::::::::::
अरुणा दुद्दलवार @✍️
