*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पोस्ट कार्ड*
वितभर पोस्ट कार्ड
किती दुर जायचे
मनातले हितगुज
सुखरूप पोहचवायचे
एकमेकांच सुख दुःख
किती आस्थेने वाचायचे
आपुलकीने मिळालेले कार्ड
किती काळजीने ठेवायचे
तिकडचा निरोप मिळाल्यावर
इकडची खूशाली कळवायचे
तिकडून पत्र येईल म्हणून
पोस्टमनची वाट बघायचे
सायकलची घंटी वाजली की
हातातलं काम सोडायचे
आपलं काही कार्ड आलंय का म्हणून
पोस्टमनला विचारायचे
पत्र नाही आले की
हातात पेन घ्यायचे
तिकडून पत्र येण्यासाठी
इकडून पत्र लिहून पाठवायचे
दोन शब्द सुखाचे वाचायला
किती जीवाची आटापिटा व्हायची
दुर राहून ही एकमेकाप्रती
किती जिव्हाळा किती प्रेम किती गोडी दिसायची
लवकर पत्र आले नाही तर
काळजात धडकी भरायची
एकमेकांची राजीखुशी विचारायला
रोज पत्र लिहायची
चार ओळींचे पत्र वाचून
मन गहिवरून जायचे
भेटीसाठी नकळत पावले
एकमेकांच्या गावाकडे पळायचे
आता पोस्ट कार्ड कुठे हरवले
कोणाला सापडत नाही
मोबाईलवरून दिलेला निरोप
काळजाला भिडत नाही
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९४७९११३५४७
