You are currently viewing राष्ट्रीय एरोबिक्स व हिप-हॉप स्पर्धा

राष्ट्रीय एरोबिक्स व हिप-हॉप स्पर्धा

*राष्ट्रीय एरोबिक्स व हिप-हॉप स्पर्धा*

*एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या गौरी गाडगीळचे घवघवीत कामगिरी*

पुणे :

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठाची विद्यार्थिनी गौरी गाडगीळ हिने २०व्या आयएसएएफएफ राष्ट्रीय एरोबिक्स व हिप-हॉप स्पर्धा २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विद्यापीठाचा गौरव वाढविला आहे. ही स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल, अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे पार पडली.

एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये (एमआयटी एसओईआर) शिक्षण घेत असलेल्या गौरीने ‘१९ वर्षांवरील फिटनेस एरोबिक्स’ प्रकारात युगल व त्रयी या दोन्ही गटांत दोन सुवर्णपदके पटकावली. याशिवाय, हिप-हॉप संघ स्पर्धेत तिच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. संघाच्या नृत्यरचना (कोरिओग्राफी) साठी केलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना पदक व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय स्तरावरील या यशाच्या जोरावर गौरीची आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, ही त्यांच्या क्रीडा कारकिर्दीतील एक महत्त्वाची उपलब्धी ठरली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठ प्रशासनाने त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या शिस्तबद्ध सराव, सातत्य व मेहनतीचे कौतुक केले. या यशासाठी गौरीने विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट प्रा.डाॅ.सायली गणकर, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, डाॅ.नचिकेत ठाकूर, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, प्राचार्या डॉ. प्रिया सिंग, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड, विद्यार्थी व्यवहार संचालक डॉ. सूराज भोयार यांचे मार्गदर्शन व सततच्या प्रोत्साहनाबद्दल आभार मानले.

हे यश एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या सर्वांगीण शिक्षण धोरणाचे प्रतीक असून, विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रासह क्रीडा व सहशैक्षणिक उपक्रमांतही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होत असल्याचे अधोरेखित करते.

प्रतिक्रिया व्यक्त करा