You are currently viewing आमदार दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर आयी कुंभारवाडी सभामंडपाचे भव्य उद्घाटन

आमदार दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर आयी कुंभारवाडी सभामंडपाचे भव्य उद्घाटन

आमदार दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर आयी कुंभारवाडी सभामंडपाचे भव्य उद्घाटन

दोडामार्ग

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री. दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या आयी कुंभारवाडी येथील सभामंडपाचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या सभामंडपामुळे गावातील सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध झाली असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या उद्घाटन प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख श्री. गणेशप्रसाद गवस, शिवसेना उपतालुका प्रमुख श्री. बबलु पांगम, उपतालुका प्रमुख श्री. दादा देसाई, श्री. रामदास मेस्त्री, सरपंच संघटना अध्यक्ष श्री. अनिल शेटकर, आयी शिवसेना शाखाप्रमुख श्री. विनोद बेळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच आयी गावाचे विद्यमान सरपंच श्री. तुषार नाईक, उपसरपंच श्री. भदी गवस, ग्रामपंचायत सदस्य सौ. प्रज्योती एकावडे, सौ. सुप्रिया नाईक, श्री. जयवंत कासार, श्री. रविंद्र हरवाळकर, श्री. शुभम धुरी, श्री. खुशाली शेटकर, श्री. अनंत शेटकर, श्री. संजय शेटकर, श्री. गोपाळ शेटकर यांच्यासह आयी कुंभारवाडी येथील असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी आमदार दिपकभाई केसरकर यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सभामंडपामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा