You are currently viewing थंडी पळे दूर
Oplus_16908288

थंडी पळे दूर

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*☃️थंडी पळे दूर🔥*

 

धुंद कुंद गारठून गेली सकाळ

कसा आवरावा कामाचा घोळ

 

कुडकुडत्या थंडीत आखडून

हात पाय जाती जणू जखडून

 

वाटे घ्यावी उब शेकोटीपेटवून

धडपडत पाचोळा गोळाकरुन

 

आगेने उठल्या ज्वाळाधडाडून

पोटात भूकआगडोंब कडाडून

 

शेकोटीने थंडी नरमली आहे

उब जाणवून ती वरमली आहे

 

कसेबसे बळतेशरीरातआणत

चूलपेटवूनआलेचहाआधणात

 

गारठलेली पोरे उठली वासाने

 

भाकरी,चहा भुरकती खुशीने

 

मायेच्या उबेने थंडी पळे दूर

मी निवांत ,पांखरे उडती भुर्रर

 

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

कला शिक्षिका

प्रतिक्रिया व्यक्त करा