You are currently viewing तुमच्या आजारावर विनामूल्य नैसर्गिक उपचार अमरावतीमध्ये शिबीर

तुमच्या आजारावर विनामूल्य नैसर्गिक उपचार अमरावतीमध्ये शिबीर

 

कोणत्याही प्रकारचे औषध न घेता आपली प्रकृती ठीक होऊ शकते यावर कोणी विश्वास ठेवणार नाही परंतु ती वस्तुस्थिती आहे आणि ही गोष्ट मी स्वतः अनुभवली आहे. अमरावतीमध्ये पितामह डॉ. जीवनलाल गांधी वय वर्ष 90. हे अमरावतीकरांना मिळालेले एक वरदान आहे. डॉक्टर साहेबांकडे जा. ते कोणतेही औषध देणार नाहीत. पण तुम्हाला आजाराचे जे पथ्यपाणी करायला सांगतील ते तुम्ही केले तर तुम्ही रोग मुक्त झाले म्हणून समजा. डॉ. जीवनलाल गांधी हे आमचे पारिवारिक मार्गदर्शक आहेत. या वयातही हे पायी फिरतात .लेखन करतात आणि शनिवार रविवार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय रोग निदान कार्यशाळांना मार्गदर्शन करतात. मला त्यांचा स्वतः अनुभव आलेला आहे. आणि म्हणूनच मी हा लेख लिहिण्याचे धाडस करीत आहे.

तसाच एक दुसरा प्रयोग अमरावती शहरात सुरू आहे. त्या संस्थेचे नाव आहे निरोग आणि दुकानाचे नाव आहे दवा (ना) खाना. खरं म्हणजे दवा (ना) खाना ही सर्वसामान्यांना न पटणारी गोष्ट आहे. पण मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो ही आपण जर खरोखर या प्रणालीचा गोष्टींचा अवलंब केला तर आपणास देखील दवाखान्याचे तसेच औषधांचे तोंड पाहावे लागणार नाही. (याला थोडेफार अपवाद असू शकतात). या सर्वांसाठी एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे. ही सुवर्णसंधी निरोग संस्थेचे श्री सुरेश करवा श्री नंदूभाऊ राठी. अरूणभाई टाक. राधेश्याम भुतडा व त्यांच्या सर्व मित्रांनी घडवून आणलेली आहे. यावर्षीचे शिबिर येत्या दोन जानेवारी ते 8 जानेवारी या कालावधीत अमरावतीच्या धनराज लेन अंबागेटच्या आत या भागातील माहेश्वरी भवनमध्ये केलेली आहे. विशेष म्हणजे गावावरून येणाऱ्या शिबिरार्थींची निवास व्यवस्था माफक दरात संयोजकांनी केली आहे. डॉक्टरांचा एक रुपयाचा देखील खर्च या शिबिरात नाही आहे.

उत्तर प्रदेशातील मेरठ मध्ये एक संस्था आहे. तिचे नाव आहे आय ए एस एस. या संस्थेचे काम तिथले डॉ. गोपाल शास्त्री व त्यांचे सहकारी हे पाहतात. ते पूर्ण वर्षभर भारतात फिरतात. आणि त्यांनी एक मंत्र जगाला दिलेला आहे. तो म्हणजे दवा (ना ) खाना. मी ही शिबिरे गेल्या ८ वर्षापासून करीत आहे. खरं म्हणजे माझा या गोष्टीवर विश्वास नव्हता आणि कारणही सबळ होते. औषध न घेता प्रकृती ठीक होऊ शकते हे माझ्यासारख्या विज्ञाननिष्ठ माणसाला पटण्यासारखे नव्हते. परंतु मित्रवर्य श्री प्रदीप कोठारी यांनी आग्रह करून मला अमरावतीच्या सराफा परिसरातील माहेश्वरी भवनमधील या शिबिराला घेऊन गेले. या शिबिराला मी थोडा अनिच्छेनेच गेलो. कारणही तसंच होतं. कारण या शिबिरातील डॉक्टर फक्त एकच वेळा जेवण करा असा सल्ला देतात. मला तो न परवडणारा होता. एकतर मला रोज सतरा-अठरा तास काम करावे लागते. सतत प्रवास करावा लागतो. भाषणे द्यावी लागतात. लेखन करावे लागते. येणाऱ्या फोनवर बोलावे लागते. भेटायला येणाऱ्या लोकांशी चर्चा करावी लागते. त्यामुळे माझा या शिबिरात एक वेळा जेवा यावर फारसा विश्वास नव्हता. परंतु प्रदीप कोठारींनी यांनी जेव्हा फारच आग्रह धरला तेव्हा मला त्यांना नाही म्हणता आले नाही. आणि मग जेव्हा शिबिराचे सात दिवस संपले तेव्हा माझ्या लक्षात आले. गोष्ट पुरेशी ऐकून घेतल्याशिवाय आपण त्याबद्दल पक्के विधान करू नये आणि गेल्याआठ वर्षात मी अनेक लोकांना डॉ.जीवनलाल गांधी डॉ. गोपाळ शास्त्री डॉ.गाडगे (अकोला ) डॉक्टर जया काळे शेगाव निरोग संस्थेचे सुरेश करवा. नंदूभाऊ राठी परतवाड्याचे बाळूभाऊ देशमुख यांच्या संपर्कात आणले.

तुम्ही कोणताही आजार सांगा या सर्वांजवळ त्यांचे उत्तर तयार आहे. हे नैसर्गिक आहे. ते तुम्हाला कोणताही औषधोपचार सांगणार नाहीत. फक्त आहारात बदल सांगतील. आणि काही नैसर्गिक पदार्थ सेवन करण्यास सांगतील. प्रसंगी उपवास करायला सांगतील. प्रकृती ठणठणीत करून देतील. तुम्हाला फक्त एक फोन करावा लागतो. महेश भावनातील शिबिरामध्ये मी एक गोष्ट शिकलो. तुम्ही तुमचा आहार सिमित ठेवला तर कोणताही आजार तुमच्यावर आक्रमण करू शकत नाही. तसेच जेवढे पदार्थ कच्चे खाता येतात तेवढे तुम्ही खाण्याचा प्रयत्न करा. तसेच फळे व फळांचा तसेच इतर भाज्यांचा रस करून घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यांनी उदाहरण दिले आहे ते प्राण्यांचे. ते सर्व काही कच्चच खातात आणि ठणठणित राहतात. त्यांचा दुसरा महत्त्वाचा भर आहे इनिमा वर. या शिबिरातील डॉ. यांच्यानुसार आपण आले तसे खूप खात राहतो. त्यामुळे आपल्या अन्ननलिका तसेच शरीरातील इतर नलिका ह्या स्वच्छ करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी इनिमा हा प्रकार सर्वात स्वस्त व फायदेशीर आहे. तो घरच्या घरी करता येतो. तुम्ही काही दिवस एनिमाचा प्रयोग केला तर तुमचे पोट स्वच्छ होईल. पेट साफ रोग साफ. हे तत्व यां शिबिराने शिकवले आहे. मी स्वतः हा प्रयोग करून पाहिला आणि माझ्या प्रकृतीमध्ये फरक पडला. दुसरी महत्त्वाची गोष्ट या शिबिरातील डॉक्टर आवर्जून सांगतात. अनेकांना ती पटत नाही. त्यांचे म्हणणे आहे की दिवसातून फक्त एकच वेळा जेवण करा आणि तेही सायंकाळच्या वेळेस. सर्वसाधारणपणे लोक सकाळी नाश्ता करतात. नंतर जेवण करतात. नंतर दुपारचा नाश्ता होतो. आणि रात्रीचे जेवण होते. आपल्या पोटावर हा सतत मारा होत असतो. त्यांचे म्हणणे असे आहे की तुम्ही जे जेवण केलेले आहे. त्याचा निचरा तर होऊ द्या. यासाठी त्यांनी जो मार्ग सांगितला आहे तो स्वस्त आहे. पण आजच्या हाय फाय संस्कृतीला तो कितपत लागू होईल हे सांगणे कठीण आहे.

डॉ.गोपाळ शास्त्री यांचे म्हणणे आहे की सकाळी नाश्त्याच्या जागी तुम्ही रस घ्या. नंतर मोड आलेले कडधान्य घ्या. तुम्हाला भूक लागत असेल तर काकडी, टमाटर, गाजर इत्यादी पदार्थांचा सलाड घ्या. आणि सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास जेवण करा. हे तत्व जर तुम्ही पाळले तर तुम्हाला आजारच होणार नाही. असा त्यांचा दावा आहे. आणि तो बहुतांश प्रमाणात खरा देखील ठरला आहे. इतरांचे मला माहीत नाही. पण माझ्या बाबतीत मला या प्रणालीचा भरपूर उपयोग झाला आहे. खरे म्हणजे या लेखांमध्ये सर्वच बाबी सविस्तर लिहिता येणार नाहीत. त्यासाठी आपणास शक्य असल्यास शिबिरात यावे. उत्तर प्रदेशमधून आलेले डॉ गोपाळ शास्त्री त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपला आजार सांगावा आणि त्यावर डॉक्टर साहेब उपाय योजना करतात आणि तेही विनामूल्य आणि त्यांचे तत्व राहील दवा (ना) खाना. या शिबिरामध्ये मी असे लोक पाहिले आहेत. येथे पहिल्या दिवशी येतात. आपली बीपी शुगर तपासून घेतात. सात दिवस शिबिरात राहतात. शेवटच्या दिवशी जेव्हा तपासणी होते तेव्हा त्यांच्या घ्या बीपीवर व शुगर वर बरेचसे नियंत्रण आलेले असते. ते सात दिवसात एवढा चमत्कार होऊ शकतो आणि तोही एक रुपयाही खर्च न करता.

आपण कोरोनाच्या काळात पाहिले. लाखो रुपये खर्च झाले. अनेक मित्रांना गमवावे लागले. मित्रांनो आता तरी जागे व्हा तुझे आहे तुजपाशी परी तू रस्ता चुकला असेल स्वतः आत्मचिंतन करा मन चंगा तो कठौती में गंगा हे तत्व अनुसरून आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करू आपले आरोग्य चांगले राहू शकते हा एक मूलमंत्र अनुकरण्याचा प्रयत्न करा.

 

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा