वैभववाडी
एडगाव पास्टेवाडी येथील शेत विहिरीत रविवारी रात्री जंगली गवा पडल्याचे समोर आले आहे. वनविभागाचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीचा काही भाग खोदून विहिरीत भराव टाकून गवा बाहेर आला. ही घटना 15 फेब्रुवारी रोजी घडली. एडगाव पास्टेवाडी येथील लीलावती दशरथ पवार यांच्या मालकीच्या पाण्याचे सखल येथील विहिरीत गवा वन्यप्राणी रात्रीच्या वेळी पडला होता.दरम्यान ही माहिती वन परिमंडळ विभाग वैभववाडीचे सर्व कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थाच्या मदतीने कच्या विहिराचा काही भाग खोदून विहिरीत मातीचा भराव टाकला त्यानंतर गवा विहिरीतून बाहेर सुखरुप आला व जंगलाच्या दिशेने पळाला. या वेळी वैभववाडी वनपाल एस.एस.वागरे,वनरक्षक खांबाळे ए. एच. काकतीकर, करूळ वनरक्षक पी.डी.पाटील, वन रक्षक करूळ तपासणी नाका एन.एस.लोखंडे,वन रक्षक ठाकूरवाडी आर.एल. बिक्कड, वनमजुर सी.एल.मराठे, एडगाव ग्रा.प.सदस्य प्रज्ञा रावराणे, दत्ताराम पास्टे,चंद्रकांत घाडी,सूर्यकांत पवार,सुनील घाडी, रमेश घाडी, मधुसूदन घाडी यांनी गवा बाहेर काढण्यासाठी मदत केली.