सावंतवाडी :
सावंतवाडी उभा बाजार येथील रहिवासी सौ. अमिता दत्तप्रसाद मसुरकर (वय ५५) यांचे शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे निधन बेळगाव येथील के. येळी रुग्णालयात झाले.
त्या सुवर्ण व्यवसायिक दत्तप्रसाद प्रभाकर मसुरकर यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती दत्तप्रसाद, मुलगा वेदांत, सून डॉ. दीक्षा मसुरकर तसेच दीर, चुलते, नणंद, भावजय, पुतणे व संपूर्ण मसुरकर कुटुंबीय असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने मसुरकर कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी उपलकर स्मशानभूमीत होणार आहेत.
