हिंमत असेल तर थांबवून दाखवा ; भाजप नेते निलेश राणेंचे राज्य सरकारला आव्हान
मालवण
येत्या १९ फेब्रुवारीला साजरी होत असलेली शिवजयंती असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि थाटामाटाने साजरी करण्यात येणार असल्याचे भाजपचे प्रदेश चिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी जाहीर केले आहे. माझ्या सोबत यावेळी असंख्य शिवभक्त असतील, हिंमत असेल तर थांबवून दाखवा, असे आव्हान श्री. राणे यांनी राज्य शासनाला दिले आहे.
१९ फेब्रुवारीला शासकीय शिवजयंती साजरी होत आहे. मात्र कोरोनामुळे यंदा शिवजयंती मर्यादेत स्वरूपात साजरी करावी, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. मात्र एकीकडे मंत्र्यांचे वाढदिवस, पद्ग्रहण सोहळे हजारोंच्या गर्दीत होत असताना केवळ शिवजयंतीलाच बंधने का ? असा सावंत माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थित करून याचा तीव्र निषेध केला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मी दरवर्षी प्रमाणे महाराजांच्या मंदिरात अभिषेक करणार आहे. मोठ्या संख्येने माझ्या सोबत शिवभक्त असतील, असेल हिंमत तर ठाकरे सरकारने मला थांबवून दाखवावं, आव्हान निलेश राणे यांनी दिलं आहे.