You are currently viewing कारिवडे माडखोल रस्त्यावरील कट्टा पूलासाठी एक कोटी 48 लाख रुपये निधी मंजूर…

कारिवडे माडखोल रस्त्यावरील कट्टा पूलासाठी एक कोटी 48 लाख रुपये निधी मंजूर…

जि. प. सदस्य मायकल डिसोजा यांचा पाठपुरावा

सावंतवाडी

गेली बरीच वर्ष लोकांची सतत मागणी असणारा व ३० वर्ष रखडलेला अशा कारिवडे माडखोल रस्त्यावरील कट्टा पूलासाठी शिवसेनेकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. हा पूल व्हावा म्हणून जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा सतत पाठपुरावा करत होते. या कामासाठी माजी पालकमंत्री आ. दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून एक कोटी ४८ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम मंजूर झाल्याबद्दल कारिवडे गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून शिवसेना पदाधिकाऱ्यांचे व जिल्हा परिषदचे मायकल डिसोजा यांचे जाहीर आभार मानले. या कामाचे भूमिपूजन लवकरच माजी पालकमंत्री दीपक केसरकर विद्यमान पालकमंत्री उदय सामंत खासदार विनायक राऊत व तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या माध्यमातून होणार आहे अशी माहिती मायकल डिसोझा यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा