You are currently viewing कसाल जिल्हापरिषद विभागातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

कसाल जिल्हापरिषद विभागातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

*कसाल जिल्हापरिषद विभागातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर*

*कसाल जि. प. विभागप्रमुख पदी रविंद्र कदम यांची नेमणूक*

*मा.आ. वैभव नाईक,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केले अभिनंदन*

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कसाल जिल्हापरिषद विभागाची बैठक माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी संपन्न झाली. या बैठकीत जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये कसाल जि. प. विभागप्रमुखपदी रविंद्र (रवीबुवा) कदम, उपतालुका संघटकपदी सुनील बोंद्रे, उपविभाग प्रमुखपदी निलेश परब, युवासेना विभागप्रमुखपदी रविंद्र परब, युवासेना उपविभागप्रमुखपदी मनीष पारकर,ओरोस उपशहरप्रमुखपदी प्रशांत परब,ओरोस शाखाप्रमुखपदी रोहन सावंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. माजी आमदार वैभव नाईक व उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुका संघटक सचिन कदम,ओरोस शहरप्रमुख भगवान परब,कसाल शहरप्रमुख नंदू आंबेरकर,गिरीश मर्तल,गणेश मेस्त्री,संतोष सामंत, प्रसाद गावडे,प्रकाश कसालकर, संतोष सावंत,बाबू शिरवणकर आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा