कणकवली
कणकवली पंचायत समितीच्या उपसभापती दिव्या पेडणेकर यांनी त्यांच्या उपसभापतीपदाचा राजीनामा सभापतींकडे सुपूर्द केला आहे. पक्षीय धोरणानुसार त्यांनी हा राजीनामा दिल्याचे समजते. त्यामुळे आता नवीन उपसभापती निवडीकडे लक्ष लागून राहिले आहे. कणकवली पंचायत समितीमध्ये १६ पैकी १५ सदस्य भाजपाचे राणे समर्थक असल्याने उपसभापतीपदी भाजपच्या सदस्यांची वर्णी लागणार हे निश्चित आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय हा माजी मुख्यमंत्री नारायण राणे आमदार नितेश राणे यांच्याकडून घेतला जाणार आहे.