केंद्रिय मंत्री नाम.डॉ.रामदास आठवले यांच्या संघर्ष,त्याग आणि योगदानातून आर.पी.आय.मजबूत होत आहे – नगरसेविका सौ.ज्योती जाधव .
नाम.आठवले यांना वाढदिवसाच्या दिल्या मंगलमय शुभेच्छा!
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात आपली अस्मिता व अस्तीत्व सामावलेले आहे,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या व त्यांच्या खुल्या पत्रावर आधारीत पक्षाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री -नाम.डॉ.रामदास आठवले यांचे राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व लाभलेले आहे,त्यांच्या संघर्ष,त्याग आणि योगदानातून पक्ष मजबूत होत असल्याचे मत आर.पी.आय.(आठवले)महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा दोडामार्ग च्या नगरसेविका सौ.ज्योती रमाकांत जाधव यांनी व्यक्त करत नाम.आठवले यांना त्यांच्या वाढदिवसानिमीत्त मंगलमय शुभेच्छा दिल्या.
देशातील दलीत,शोषित,पिढीत व कष्टकरी बहुजन समाजातील मोठा वर्ग त्यांच्या नेतृत्वाशी जोडला गेला आहे.
नाम.आठवले यांचा 25 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा होत असतो,संपूर्ण देशभर त्यांचा वाढदिवस हा कार्यकर्ते व जनतेतून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो,व त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या जातात.कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील नाम.आठवले यांनी स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर आपले राजकीय अस्तित्व निर्माण केले आहे.बाबासाहेबांचा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचविण्यात ते यशस्वी होत आहेत,या नेतृत्वाबद्दल प्रत्येकाच्या मनात आदराची भावना आहे.
सर्व सामान्यांच्या अडचणीच्या काळात धाऊन जाणारे,गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि समाजावर होते असलेल्या अन्याय-अत्याचाराविरद्ध पेटून उठणारे नेते म्हणून नाम.आठवले यांच्याच नेतृत्वा कडे पाहिले जाते.आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात नाम.आठवले यांचे नेतृत्व लोकप्रिय होत आहे,महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे तसेच त्यांच्या न्यायहक्कासाठी लढणारे नाम.आठवले यांच्या नेतृत्वाशी महिला देखील मोठ्या प्रमाणात जोडल्या गेल्या आहेत,त्यांच्या नेतृत्वात आज पक्षाची महिला आघाडी उभी राहिलेली आहे,देशपातळीवर महिलांची ताकद नाम.आठवले यांच्या नेतृत्वाला सतत साथ देत आहे.
दलीत पॅंथर सारख्या लढवय्य चळवळीतून हे नेतृत्व पुढे आलेले असून आज आर.पी.आय.चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चळवळीला देखील खंबीर नेतृत्व देत आहेत,नाम.आठवले हे क्रांतीकारक नेतृत्व म्हणून त्यांच्या नेतृत्वाकडे पाहिले जाते.नाम.आठवले यांच्याजवळ दूरदृष्टी आहे,प्रत्येक कार्यकर्त्याला ते नावाने ओळखतात,आपुलकीने विचारपूस करणारे,गर्दीतील नेते,राष्ट्रीय नेतृत्व करत असले तरी अगदी ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणारे,प्रत्येकाला आपलेसे वाटणारे नेते,आठवले साहेब प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलेले आहेत.प्रत्येकाला भेट देतात,संवाद साधतात,मी गेल्या 4 वर्षापूर्वी कपबशी या चिन्हावर कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणूकीत निवडून आले,प्रथमच मी नगरसेविका बनले,त्यावेळी नाम.आठवले यांनी माझा गोव्यात आले असता सत्कार केला.त्यावेळी गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते,तो आनंदाचा क्षण मी विसरू शकत नाही.अशा भावना सौ.ज्योती रमाकांत जाधव यांनी व्यक्त केल्या.
