You are currently viewing रोटरी क्लब सावंतवाडीचे माजी अध्यक्ष रो. विजय कामत यांचे वडील क्रिस्टवासी एन. बी. कामत यांचे निधन

रोटरी क्लब सावंतवाडीचे माजी अध्यक्ष रो. विजय कामत यांचे वडील क्रिस्टवासी एन. बी. कामत यांचे निधन

रोटरी क्लब सावंतवाडीचे माजी अध्यक्ष रो. विजय कामत यांचे वडील क्रिस्टवासी एन. बी. कामत यांचे निधन

सावंतवाडी

रोटरी क्लब सावंतवाडीचे माजी अध्यक्ष रो. विजय कामत यांचे वडील, ज्येष्ठ व आदरणीय नागरिक क्रिस्टवासी एन. बी. कामत (वय अंदाजे ८५) यांचे आज दुपारी वृद्धापकाळामुळे निधन झाले.
एन. बी. कामत हे सार्वजनिक बांधकाम विभागात (P.W.D.) अभियंता म्हणून कार्यरत होते. अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व कामसू अधिकारी म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती. सर्व समाजात ते प्रेमळ व आदराने पाहिले जाणारे व्यक्तिमत्त्व होते.
त्यांचा जन्म सन १९४० मध्ये धारवाड येथे झाला. नोकरीनिमित्त ते सावंतवाडीत आले व येथेच स्थायिक झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा रो. विजय कामत (आर्किटेक्ट), कर्नाटक येथे वास्तव्यास असलेल्या दोन विवाहित मुली, सून व दोन नाती असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दुपारी सावंतवाडी येथील साळईवाडा येथील निवासस्थानापासून वेंगुर्ला येथे निघणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा