You are currently viewing १८ ते २० फेब्रुवारीला सावंतवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रांच्या प्रतिकृती व ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन

१८ ते २० फेब्रुवारीला सावंतवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रांच्या प्रतिकृती व ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन

सावंतवाडी :

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या संकल्पनेतून अर्चना फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगभरातील अस्सल दुर्मिळ चित्रांच्या प्रतिकृती आणि ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे सिंधुदुर्गवासीयांना पाहण्यासाठी दिनांक १८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमासाठी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील प्रसिद्ध कलाकार बहिर्जी नाईक फेम अजय तापकिरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

जास्तीत जास्त इतिहास प्रेमी, अभ्यासकांनी, विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन ‘आपला जाणता राजा’ ३५० वर्षांपूर्वी नक्की कसा दिसत होता. अस्सल फोटो प्रतिकृती, त्याबद्दल असणारी माहिती सोबतच शिवकालीन शस्त्र पहावयास मिळणार आहेत. काझी शहाबुद्दीन हॉल,सावंतवाडी येथे दिनांक १८ फेब्रुवारी २ ते २० फेब्रुवारी दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत या संधीची अनुभूती नक्कीच घ्यावी असे आवाहन सौ. अर्चना घारे परब यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 9 =