You are currently viewing राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

ग्राहकांना हक्क आणि कर्तव्याची जाणीव असावी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गनगरी

 ग्राहक हा बाजारपेठेचा केंद्रबिंदू असून त्याचे हक्क सुरक्षित महत्वाचे आहे. बदलत्या काळात ऑनलाईन व्यवहार, डिजिटल पेमेंट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांनी बिल घेणे, उत्पादनाविषयी संपूर्ण माहिती मिळवणे, अटी व शर्ती वाचणे आणि फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहणे गरजेचे आहे. तक्रार असल्यास ग्राहकांनी न घाबरता अधिकृत यंत्रणांकडे तक्रार दाखल करावी. ग्राहकांनी आपल्या हक्कांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवून सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.

            अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण अयोगाच्या अध्यक्षा इंदुमती मलुष्टे, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, उपजिल्हाधिकारी आरती देसाई,  श्रीमती वराळे, अशासकीय सदस्य श्री पार्सेकर आणि श्री पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री सहारे यांनी  ग्राहकांचे सहा मूलभूत हक्क- माहितीचा हक्क, निवडीचा हक्क, सुरक्षिततेचा हक्क, ऐकून घेण्याचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क आणि ग्राहक शिक्षणाचा हक्क याविषयी माहिती दिली. तसेच ग्राहकांनी पर्यावरणपूरक, स्थानिक व दर्जेदार उत्पादनांना प्राधान्य देऊन जबाबदारीने खरेदी करावी, असेही सांगितले.

            यावेळी ग्राहक जनजागृतीपर व्याख्यान, पथनाट्य सादरीकरण, पुस्तिकीचे प्रकाशन देखील करण्यात आले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा