नगरसेविका सायली दुभाषी यांनी घेतली माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांची भेट…
सावंतवाडी
येथील नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना कडून विजयी झालेल्या ॲड. सायली दुभाषी यांनी आज माजी मंत्री प्रवीण भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी भोसले यांनी सायली दुभाषी यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सायली यांचे सासरे आणि माजी नगरसेवक स्वर्गीय सतीश दुभाषी यांनी ज्याप्रमाणे जनसेवेचा वारसा जपला होता, तसाच वारसा सायली यांनीही पुढे चालवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांचे पती बाबल्या दुभाषी उपस्थित होते.
