*पत्रकार तुळशीदास कुडतरकर यांना मातृशोक*
*शोभा कुडतरकर यांचे वृद्धापकाळाने निधन*
कणकवली (प्रतिनिधी)
शिरवल रतांबेवाडी येथील शोभा कृष्णा कुडतरकर (वय ७५) यांचे वरळी मुंबई येथील निवासस्थानी रविवारी दुपारी तीन वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आहे.
त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, विवाहित मुलगी, जावई, दीर, भावजय, पुतणे, पुतणी, नातवंडे असा परिवार आहे.
शोभा कुडतरकर या मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभामुळे परीचित होत्या.त्यांच्या निधनाबद्दल शिरवल मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
पत्रकार तुळशीदास कुडतरकर आणि क्रिडा समालोचक रामदास कुडतरकर यांच्या त्या आई होत.
