You are currently viewing “त्या” बांधकामांच्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी आंबोली मंडल येथे शासकीय कॅम्प

“त्या” बांधकामांच्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी आंबोली मंडल येथे शासकीय कॅम्प

सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांची माहिती

सावंतवाडी

गेले दोन तीन महिने अनधिकृत बांधकाम प्रकरणी दंडात्मक कारवाईचा नोटिसा अनेक ग्रामपंचायतीतील नागरिकांना गेली आहेत. त्यामुळे घरमालकामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, याबाबत सरपंच संघटनांनी आज तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासोबत बैठक घेतली होती. यावेळी या नोटिसा संदर्भात चर्चा झाली आहे. यावेळी अनधिकृत बांधकाम असलेल्या बांधकामाची दाखल्याची परिपूर्णता करण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी आंबोली मंडल येथे कॅम्प घेऊन शासकीय कागदपत्रे पूर्ण करून ती बांधकाम अधिकृत करून तहसीलदार म्हात्रे यांच्या माध्यमातून सरपंच संघटना त्यांना न्याय मिळवून देईल असा विश्वास सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी व्यक्त केला आहे. यावेळी रिक्त असलेली पोलिस पाटील पदे देखील भरण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहेत. तसेच नमुना क्रमांक २३ रस्ता नोंद संदर्भात त्रुटींची पूर्तता करण्याबत दुय्यम निबंधक याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

यावेळी सरपंच संघटनेतील गुणाजी गावडे, अभिलाष देसाई, हनुमंत पेडणेकर, वासुदेव जोशी, दिनानाथ कशाळीकर, गुरुदास गवडे, समीर गावडे, विठोबा गावडे, सावंत, सुभाष सावंत, रेश्मा गावकर, स्नेहल जामदार, सुप्रिया मडगावकर, रेखा घावरे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा