*कै. बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालय, दाणोली येथे श्रीनिवास रामानुजन जयंती उत्साहात साजरी*
*सावंतवाडी*
कै. बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालय, दाणोली येथे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील गणितीय विचार, सर्जनशीलता व बौद्धिक कौशल्य वाढावे या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत स्टोन पेंटिंग रांगोळी स्पर्धा तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. स्टोन पेंटिंग,रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गणितीय संकल्पनांवर आधारित सुंदर व आकर्षक रांगोळ्या साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेसाठी माननीय श्री देसाई सर व तिळवे सर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गणितातील आपले ज्ञान, तर्कशक्ती व जलद निर्णयक्षमता दाखवून दिली. सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.
या सर्व स्पर्धांचे यशस्वी आयोजन शाळेचे गणित शिक्षक माननीय श्री आर. जी. पाटील सर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी ठरला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण होऊन महान गणितज्ञांच्या कार्याची ओळख होण्यास मदत होते, असे मत शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील जे. आर. सर यांनी व्यक्त केले.
