You are currently viewing शहरविकासासाठी एकत्रित कामाचे आवाहन
Oplus_16908288

शहरविकासासाठी एकत्रित कामाचे आवाहन

शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांची सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी सदिच्छा भेट

सावंतवाडी :

शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराच्या विकासासाठी प्रशासनाने सर्व नगरसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक संजू परब यांनी यावेळी केले.

याप्रसंगी बोलताना संजू परब म्हणाले की, राजकीय मतभेद असले तरी शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे अत्यावश्यक आहे. आज घेतलेली ही भेट प्रेमाची असून, विरोधक असलो तरी विकासाच्या कामात सहकार्याने पुढे जाण्याचा संदेश यामधून देण्यात आला आहे.

या भेटीदरम्यान नगरसेवक बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी आणि स्नेहा नाईक उपस्थित होते.

मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी नगरसेवकांचे स्वागत करताना सांगितले की, नगरपालिकेकडून सर्व नगरसेवकांना पूर्ण सहकार्य करण्यात येईल. तसेच लवकरच नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा नगरपालिकेत औपचारिक सत्कार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जुने व नवे नगरसेवक एकत्र आल्यास सावंतवाडी शहराच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा