You are currently viewing ‘स्नेहसंगम’ २०२५ : कला, हास्य आणि गुणदर्शनाचा उत्सव सावंतवाडीत
Oplus_16908288

‘स्नेहसंगम’ २०२५ : कला, हास्य आणि गुणदर्शनाचा उत्सव सावंतवाडीत

राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा दोन दिवसीय स्नेहसंमेलन सोहळा २३ व २४ डिसेंबरला

सावंतवाडी :

शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी यांचा ‘स्नेहसंगम’ हा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दि. २३ व २४ डिसेंबर २०२५ रोजी दोन दिवस विविध रंगारंग कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता रंगावली प्रदर्शन व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन ख्यातनाम मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. याच दिवशी दुपारी ३.०० वाजता हास्य, विनोद व व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व उलगडणारा ‘शेलापागोटे’ कार्यक्रम, तर दुपारी ५.०० वाजता विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र खेबुडकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग) यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी, सावंतवाडी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीधर पाटील, सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत असणार आहेत. यावेळी उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, अमोल सावंत (अध्यक्ष, शालेय समिती – राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी), सतिशचंद्र बागवे (अध्यक्ष, शालेय समिती – चौकुळ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, चौकुळ) यांच्यासह संचालक मंडळातील श्री. संदीप राणे, श्रीमती वसुधा मुळीक, श्रीमती छाया सावंत, श्रीमती स्नेहा परब यांची उपस्थिती लाभणार आहे.

या दोन दिवसांच्या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ शिक्षणप्रेमी, विद्यार्थी व पालक वर्गांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापिका श्रीमती संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक नामदेव मुठे, उच्च माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजना ओटवणेकर, माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती प्रिती सावंत, विद्यार्थी प्रतिनिधी कु. सोहम पालव, कु. सानिका ठाकूर, सांस्कृतिक प्रमुख कु. ओंकार चव्हाण, मुख्यमंत्री कु. शुभम वरक, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. प्रांजली कबरे, सांस्कृतिक प्रमुख भक्त रजपूत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधवांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा