You are currently viewing राज्याचे मत्स्य विद्यापीठ कोकणातच व्हावे भाजप नेते रविंद्र चव्हाण यांची आग्रही भूमिका….

राज्याचे मत्स्य विद्यापीठ कोकणातच व्हावे भाजप नेते रविंद्र चव्हाण यांची आग्रही भूमिका….

सावंतवाडी
कोकणाला लाभलेला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा पाहता राज्यात होणारे मत्स्य विद्यापीठ हे कोकणातच किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यातच व्हायला हवे असा आग्रह कोकणातील सर्वच आमदारांनी धरला आहे व ते कोकणातच व्हायला हवे अशी आग्रही भूमिका भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी बंदर विकास राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मांडली.
भाजपच्या सिंधु आत्मनिर्भर अभियान , निलक्रांती क्रुषी व मस्त्यपर्यटन संस्था, सावंतवाडी नगरपरिषद यांच्या माध्यमातून जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाच्या प्रांगणात आयोजित भव्य मत्स्यमहोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मत्स्य शास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधु आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर, नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक विकास भाई सावंत, व्हीक्टर डॉन्टस, आंबोली मंडल अध्यक्ष संदीप गावडे, निलेश तेंडुलकर, डॉ. प्रसाद देवधर, निलक्रांतीचे अध्यक्ष रविकिरण तोरस्कर, न.प. आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, भाजपा शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, महिला अध्यक्षा मोहिनी मडगांवकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, सावंतवाडी निरीक्षक राजू राऊळ, प्रभाकर सावंत, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, भाजपाचे मत्स्य आघाडीचे प्रमुख चेतनदादा पाटील न.प. गटनेते राजू बेग, माजी सभापती ॲड. परिमल नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विरनोडकर, दिपाली भालेकर, केतन आजगांवकर, शहर सरचिटणीस परिक्षित मांजरेकर, बंटी पुरोहित, दिलीप भालेकर, नेमळे सरपंच, विनोद राऊळ, विनोद सावंत आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर योजनेंतर्गत मत्स्यसंपदा योजनेसाठी २० हजार कोटींची तरतूद केली आहे. या मत्स्य महोत्सवाच्या माध्यमातून या दृष्टीने एक पाऊल आम्ही टाकले असून अनेक तरुण या व्यवसायात उतरण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ८ धरणे, ३४ तलाव यातील गोड्या पाण्यातील माशांचा लिलाव जो यापूर्वी कोल्हापूर व अन्य भागातील लोक घ्यायचे तो लिलाव आता जिल्ह्यातील तरुणांनी घेतला आहे. त्यामूळे भविष्यातही या माध्यमातून जिल्ह्यातील कोकणातील तरुणांनी गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायातून आपली समृद्धी साधावी. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

या महोत्सवानिमित्त आयोजित तसेच मत्स्य पाककला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक प्रथम क्रमांक विजेत्या संपदा जाधव, द्वितीय प्रगती कानविंदे, तृतीय स्नेहा शिरसाट व उत्तेजनार्थ सुनिता सावंत, वैष्णवी राऊळ यांनाही यावेळी रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आलं. तसेच मत्स्य शिल्पकला स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते आनंद मेस्त्री द्वितीय क्रमांक विजेते काका सावंत, तृतीय क्रमांक विजेते आशिष कुंभार , उत्तेजनार्थ विजेते रविराज चिपकर, समीर चांदरकर यांना तसेच
मत्स्य चित्रकला स्पर्धेतील लहान गटाचे विजेती श्रेया चांदोरकर, द्वितीय आयुष पाटणकर, तृतीय धनदा फाले,
उत्तेजनार्थ अथर्व सावंत, ज्ञानेश्वर राऊळ यांना तसेच मोठ्या गटातील प्रथम क्रमांक विजेता प्रसाद राजा खोरागडे, द्वितीय रोहीत ठाकर, तृतीय सायली भैरे,
उत्तेजनार्थ पूर्वा चांदरकर, पूर्वा धाकोरकर,
कोळी नृत्य स्पर्धेतील विजेत्या नृत्यांगना
नेहा जाधव व स्नेहल करंबळेकर, द्वितीय दिक्षा नाईक व नंदिनी बिलये व तृतीय क्रमांक भक्ति जामसंडेकर व वैष्णवी गावडे तसेच उत्तेजनार्थ इशा गोडकर व सानिका सावंत या सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काम करणाऱ्या योजना तांडेल, बंदिस्त खेकडा पालनाचे डॉ. कल्पेश शिंदे, निलक्रांतीच्या स्मिता केळुसकर, प्राची सावंत – राणे, सिद्धांत उपसकर, ओंकार पुरलकर व सहकारी टीम, हितेन नाईक यांचाही या निमित्त विशेष सत्कार करण्यात आला.

फोटो – मत्स्य महोत्सवा निमित्त आयोजित विविध मत्स्य स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करताना भाजपा नेते रविंद्र चव्हाण सोबत मत्स्य शास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधु आत्मनिर्भर अभियान संयोजक अतुल काळसेकर, नगराध्यक्ष संजू परब, रविकिरण तोरस्कर, आंबोली मंडल अध्यक्ष संदीप गावडे व अन्य.

प्रतिक्रिया व्यक्त करा