ममता वराडकर १००० मतांनी विजयी, शिवसेनेचे १० नगरसेवकही विजयी
मालवण :
मालवण नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत सत्ता आपल्याकडे खेचली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या ममता वराडकर यांनी सुमारे १००० मतांची निर्णायक आघाडी घेत भाजप व उबाठा उमेदवारांचा दारुण पराभव केला आहे.
यासोबतच नगरसेवक निवडणुकीतही शिवसेनेने वर्चस्व राखत १० नगरसेवक विजयी केले आहेत. प्रभाग क्रमांक ६ मधून शिंदे शिवसेनेचे सहदेव बापर्डेकर व अश्विनी कांदळकर प्रभाग ९ मधून महेश कोयंडे हे उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालामुळे मालवणमधील भाजपला मोठा धक्का बसला आहे.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण नगरपरिषदेवर शिंदे शिवसेनेचा भगवा फडकला असून, पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. या विजयामुळे आगामी काळात मालवण शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
