मालवण :
मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत शिवसेना उमेदवार ममता वराडकर यांनी १७२ मतांची आघाडी घेतली आहे.
ममता वराडकर यांना ९८१ मते मिळाली असून भाजपच्या शिल्पा खोत यांना ८०९, तर शिवसेना (उबाठा) उमेदवार पूजा करलकर यांना ६८९ मते मिळाली आहेत. पुढील फेऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
