You are currently viewing दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १९/१२/२०२५ रोजी महादेवाचे केरवडे पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळी 10.00 वाजता संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये महादेवाचे केरवडे गावचे गावचे सरपंच सौ. परब मॅडम, महादेवाचे केरवडे गावचे ग्रामसेवक सर,वसुली गावचे सरपंच श्री.अजित परब सर, पूळास गावचे सरपंच निकम मॅडम,श्री.गुंडू सावंत तसेच संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, संस्था कर्मचारी विशाखा कासले, प्रणाली दळवी,ललित गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने लुई ब्रेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच वसुली गावचे सरपंच परब सर यांनी दिव्यांग बांधवांना अमूल्य असे मार्गदर्शन केले.व ते दिव्यांग बांधवांना मदत करत असताना त्यांना काही अडचणी येतात ते सर्व व्यक्त केले. केरवडे ग्रामविकास अधिकारी यांनी देखील दिव्यांग बांधवांना अमूल्य असे मार्गदर्शन केले.तसेच श्री.गुंडू सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. श्री गुंडू सावंत यांचे या मेळाव्यासाठी बहुमोलाचे असे सहकार्य लाभले.या मेळाव्यामध्ये एका दिव्यांग बांधवांला पेन्शन योजना करण्यासाठी फॉर्म देण्यात आले व त्यासंबंधी सर्व माहिती व कागदपत्रे सांगण्यात आले.१० दिव्यांग बांधवांना घरघंटी फॉर्म देण्यात आले व त्यासंबंधी सर्व माहिती सांगितली. ६ दिव्याग बांधवांचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे घेतली.या मेळाव्याला ५०हून जास्त दीव्यांग उपस्थित होते. उपस्थित दिव्यांग बांधवांना गुंडू सावंत यांच्या टीमने नाष्टा व उपचाराची व्यवस्था केली.सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसालच्या वतीने सर्व दिव्यांग बांधवांना भेटवस्तू देण्यात आल्या.संस्था कर्मचारी दळवी मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा