*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।गण गण गणात बोते ।।जय गजानन श्री गजानन ।।
___________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प -१२९ वे
अध्याय – २१ वा, कविता -३ री
___________________________
आता ध्यान असू द्यावे । सकल अध्यायांचे सार जाणावे ।
मनात साठवावे । श्री गजानन चरित्र हे ।। १।।
श्री गणेशु वंदिला । सकल देवतांना नमस्कार केला । चरित्रास आरंभ केला । श्री दासगणुनी प्रथम अध्यायी ।।२। ।
माघमासी सप्तमीला । स्वामी आले शेगावाला । देवीदासाच्या सदनाला । दिसले ते पहिल्यांदा,बंकट,दामोदराला ।।३।।
मंदिरी गोविंदबुवांचे कीर्तन । स्वामी ऐकती बाहेर बसून । त्यास सांगती समजावून । नसावी विसंगती तुझ्या बोलण्यात।।४।।
गोसाव्याची नवसपूर्ती झाली । विनंती स्वामींनी स्वीकारली।
प्रथा गांजाची पडली । तेंव्हापासून मठात ।।५।।
जानराव देशमुखाचे। गंडांतर टाळीले साचे । दिले तीर्थ स्वामी पायांचे । कथिले प्रकार मृत्यूचे, तृतीय अध्यायात ।।६। ।
चौथ्या अध्यायी,कथा जानकीरामाची । अक्षय-तृतीया सणाची । तो विनंती ना मानी मुलांची । देण्या विस्तव स्वामी चिलमीसाठी ।।७।।
अपराध जानकीरामाचा । त्यास आला प्रत्यय त्याचा ।
प्रकार घडला चिंचवणी नासण्याचा । भोजन समयी ।।८।।
स्वामी गजाननाला । जानकीराम शरण गेला । स्वामींनी अपराध क्षमा केला । भक्त झाला जानकीराम स्वामींचा ।।९।।
स्वामींनी मागितले कान्हवले । घरून आणण्यास सांगितले ।
चंदू मुकिंदाने शोधले । अखेर त्यास सापडले । केले अर्पण त्याने स्वामींना ।।१०।।
वसंतपूजेचा थाट झाला । शिष्यांना आनंद झाला । ब्राह्मण-वृंद संतोषला । स्वामींनी देता दक्षिणा ।।११।
कथा या असती चतुर्थ अध्यायात..
*******************************************
क्रमशः करी हे लेखन कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे -पुणे.
___________________________
