You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

*सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे अल्पसंख्याक हक्क दिन साजरा*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर, अप्पर जिल्हाधिकारी मा. श्रीम. शुभांगी साठे, निवासी जिल्हाधिकारी मा. श्री. मच्छिंद्र सुकटे, जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी मान. श्री. यशवंत बुधावले, जिल्हा माहिती अधिकारी श्री मुकुंद चीलवंत, उपजिल्हाधिकारी श्री बालाजी शेवाळे, विस्तार अधिकारी – शिक्षण विभाग श्री शोभराज शेर्लेकर, पोलीस निरिक्षक श्री. शाम बुवा तसेच जिल्हयातील अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी म्हणून श्री निसार शेख, श्री. मुरादअली शेख, एड. आश्पाक शेख, श्री. बुलंद पटेल, हाजी शेरपुद्दीन बोबडे, एड. रईस पटेल, शाहनवाज शहा, सलमान शेख, तौसिफ शेख, फादर मानवेल, श्री रावजी, श्री नितीन जठार व अल्पसंख्याक समाजाचे अनेक प्रतिनिधी उपलब्ध होते.

भारतात दरवर्षी १८ डिसेंबर हा दिवस ‘अल्पसंख्याक हक्क दिन’ (Minorities Rights Day) म्हणून साजरा केला जातो. समाजात अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळवून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

यावेळी अल्पसंख्याक समाजाच्या वतीने एड आश्पाक शेख, मुरादअली शेख, शेरपुद्दीन बोबडे, श्री रावजी व फादर मनवेल आदींनी प्रशासनासमोर विविध समस्या मांडल्या.

मा. श्री. खेबुडकर यांनी अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे व नियमित संपर्कात राहण्याचे आवाहन केले. तर श्री बुधावले यांनी अल्पसंख्याक समाजासाठी असलेल्या विविध योजनांच्या माहितीचे सादरीकरण करून आपल्या विभागाकडून सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा