You are currently viewing ओटवणेत उद्या काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर…

ओटवणेत उद्या काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर…

ओटवणेत उद्या काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर…

सावंतवाडी

ओटवणे येथील ग्रामपंचायत कार्यालयात उद्या सकाळी १० वाजता काजू पीक उत्पादन तंत्रज्ञान विषयावर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील तज्ज्ञ शास्त्रज्ञ उपस्थित राहून काजू उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

ओटवणे आणि आसपासच्या परिसरात काजू उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांना काजू लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण यांबाबत सखोल माहिती मिळावी, या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेतल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनात नक्कीच वाढ होणार असून, ओटवणे गावातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा