..हे थांबणार कधी?? – .●अँड.नकुल पार्सॅकर…●
गुन्हेगाराच्याचं ताब्यात जर व्यवस्था असेल तर कसला न्याय आणि कसलं काय?असे अनेक कोकाटे मञीमंडळात आहेत.कोणाची हिम्मत आहे कारवाई करण्याची ? कुंपणचं शेत खात आहे.हजारो कोंटीचा भ्रष्टाचार करणाऱ्यांच हातात जर सन्मानपूर्वक तिजोरीच्या चाव्या दिलेल्या असतील तर कसल्या भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या वल्गना करता?भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले एका घरात पाच पाच लोक पि.एच.डी.करतात त्यामुळेच सरकारच्या तिजोरीवर भार पडतो असे विधान करतात.केवढा मोठा विनोद.
या भ्रष्ट कारभाराला जेवढे हे बिनधास्त लुटमार करणारे नेते जबाबदार आहेत तेवढेच तथाकथित आपल्या चार भिंतीत राहून चारित्र्यवर बोलणारे आणि निवडणूकीच्या बाजारात आपली विक्री करणारे बरबटलेले मतदार पण तेवढेच जबाबदार आहेत.
हे चित्र बदलणार का ? आशावादी रहायला हरकत नसावी..पण हे चिञ फक्त नियतीचं बदलू शकते.जेव्हा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा तेव्हा नियतीचं धडा शिकवते.महाराष्ट्रात आणखीन किती भ्रष्टाचारी मंञ्याना किती काळ अभय देणार आहात ?असलेल्या पुराव्यांच्या आधारे जर खरोखरच प्रामाणिकपणे सदसद्विवेक बुद्धी शाबूत ठेवून चौकशी झाली तर निम्मे मंञी घरी बसतील.हे वास्तव आहे.
गेली काही वर्षे लाभार्थ्यांचा एक मोठा वर्ग तयार झालेला आहे.हा सर्वसमावेशक वर्ग आहे.जो नेता वेगवेगळ्या प्रकारे आपला लाभ करून देईल ते लाभार्थी या नेत्यांचे मिंधे असतात.ही साखळी एवढी मजबूत झालेली आहे की ती वेगळी करणे फार कठीण काम आहे.एखादे दुसरे तुकाराम मुंडे काही करू शकत नाहीत.
हजारो कोटींचे जमीन घोटाळे,टक्केवारी याची फक्त चर्चाच होते.चार दिवसानी नवीन एखादा स्कॅम उघडकीस आला की मागच्या गोष्टी हवेत विरतात. लोकांची मेमरी पण दिवसेंदिवस शॉर्ट होत चालली आहे.शेवटी प्रश्न एकच आहे हे थांबणार कधी ?
