You are currently viewing हळद उत्पादक शेतकरी व महिला गटांना यंत्रसामग्री अनुदानावर उपलब्ध होणार

हळद उत्पादक शेतकरी व महिला गटांना यंत्रसामग्री अनुदानावर उपलब्ध होणार

हळद उत्पादक शेतकरी व महिला गटांना यंत्रसामग्री अनुदानावर उपलब्ध होणार

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली व दोडामार्ग या 3 तालुक्यतील हळद उत्पादक शेतकरी, महिला गटांना हळद भरणी व काढणी यंत्र अनुदानावर पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली आहे.

             या योजनेतून जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी, महिला गटांना प्रति तालुका 1 यापमाणे हळद प्रक्रिया युनिट देखील देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जिल्हास्तरीय खरेदी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित घटकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंजुरी देण्यात आली.

             सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळद लागवड व प्रक्रिया योजना सन 2025-26 मध्ये राबविली जाणार आहे. या योजनेतून जिल्ह्यातील इच्छूक हळद उत्पादक शेतकरी, महिला गट यांची हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जिल्हा सांगली येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने जिल्ह्यतील शेतकऱ्यांना सांगली जिल्ह्यातील हळद लागवड करणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांच्या शेतावर हळद लागवड व प्रक्रियाबाबत अनुभव घेता आला.

             जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुकर यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हळद पिकास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच या पिकातून मिळणाऱ्या नफ्याचा विचार करता येथील हळद लागवड करणाऱ्या शेतकरी, महिला गटांना जिल्हा, तालुका व प्रभाग स्तरावर प्रशिक्ष्‍ाण आयोजित करण्यात आले होते. यामुळे हळद उत्पादक शेतकरी, महिला गटांमध्ये हळद  लावगवड व प्रक्रिया बाबतचा उत्साह वाढला. या प्रशिक्षणावेळी हळद उत्पादक शेतकरी महिला, गट यांना हळद बियाणे निवड, लागवड पद्धती, एकात्मिक खत व कीड- रोग व्यवस्थापन तसेच वाढणीपश्चात तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योग ई. बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

             सिंधुदुर्ग जिल्हयात हळद पिक लागवडीस मोठा वाव आहे. या पिकास कीड, रोग देखभाल खर्च इतर पिकांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख हळद उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जाईल असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा