You are currently viewing कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रंगणार बाल काव्यमैफल-

कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रंगणार बाल काव्यमैफल-

कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त रंगणार बाल काव्यमैफल-*

पिंपरी चिंचवड

नक्षत्राचं देणं काव्यमंच व पिंपरी चिंचवड मनपा(शिक्षण विभाग प्राथमिक )
आयोजित…बाल काव्य मैफल 2025 पिंपरी चिंचवड मनपा शाळेतील विद्यार्थ्यांची विशेष अनोखी काव्य मैफल आयोजित केली आहे.

कार्यक्रम प्रमुख पाहुणे मा. श्रावण हार्डीकर (आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा ),
मा.संगीता बांगर ( प्रशासन अधिकारी पिंपरी चिंचवड मनपा )मा. किरण गायकवाड
( समन्वय अधिकारी -मराठी भाषा संवर्धन समिती पिंपरी चिंचवड मनपा )विशेष उपस्थित श्रीकांत चौगुले
( ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत, समन्वयक )
सर्व केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका इ. उपस्थित राहणार आहे.

कार्यक्रम स्थळ-पिंपरी चिंचवड मनपा कन्या शाळा, तळमजला सभागृह, चिंचवड स्टेशन, चिंचवड,पुणे 19 येथे
कार्यक्रम दिनांक व वेळ
दिनांक- 20 डिसेंबर 2025 ( शनिवार)
( कर्मयोगी संत गाडगे महाराज पुण्यतिथी )ला
वेळ- सकाळी 11 ते 4 यावेळेत रंगणार आहे.

आयोजन व संयोजन
प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे
( कवी वादळकार- पुणे )
संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष
नक्षत्राचं देणं काव्यमंच यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड मनपा प्राथमिक शाळेतील प्रत्येक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांना यात सहभाग असणार आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या रचनासह सभागृहात वेळेवर हजर राहणे आवश्यक आहे . सर्वांना विनामूल्य प्रवेश व सहभागाबद्दल आकर्षक फोर कलर सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा