You are currently viewing झोळंबे येथे आज वॉटरशेड महोत्सव सांगता कार्यक्रम

झोळंबे येथे आज वॉटरशेड महोत्सव सांगता कार्यक्रम

झोळंबे येथे आज वॉटरशेड महोत्सव सांगता कार्यक्रम

झोळंबे (ता.दोडामार्ग …)

येथे आज दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता मराठी शाळा, झोळंबे येथे वॉटरशेड महोत्सवाचा सांगता कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व लहान-थोर नागरिक, शेतकरी, महिला व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पाणलोट समिती झोळंबे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या वेळी उद्घाटन व स्वागत समारंभासह पाणलोट विषयक जनजागृतीसाठी दशावतार नाटिका सादर करण्यात येणार आहे. तसेच बक्षीस वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वयक्तिक योजनेचा लाभ घेतलेल्या सर्व लाभार्थ्यांची उपस्थिती आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या सर्वांना टी-शर्ट व टोपी देण्यात येणार असून, सर्वांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. वॉटरशेड योजनेमुळे झालेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासह ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा