मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये नृत्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले. सोलो डान्स स्पर्धेत इयत्ता पहिली ते नववीची मुले बहुसंख्येने सहभागी झाली. इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांनी नेचर डान्स या थीमवर आधारीत निसर्गविषयक गाण्यांवर विलोभनीय नृत्ये सादर केली तर इयत्ता तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी भारतातील विविध सणांवर आधारीत सुंदर नृत्याविष्कार सादर केले तसेच पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ऋतूंवर आधारीत बहारदार गाण्यांवर उत्कृष्ट नृत्ये सादर केली त्याचप्रमाणे नववीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील लोकगीतांवर आधारीत नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी संस्थेच्या चेअरमन हर हायनेस राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोंसले, सदस्य डॉ . सतिश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रशालेच्या सहशिक्षिका श्रीम. प्रेरणा भोसले, श्रीम हिना शेख श्री. भूषण परब श्री. कुलदीप कालवणकर व क्लर्क श्रीम. दिव्या परीट यांनी विशेष मेहनत घेतली तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. सदर नृत्य स्पर्धेसाठी प्रतिथयश नृत्यांगना श्रीम.पूजा राणे यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली.
या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.
