*कसाल येथे दिव्यांग बांधवांना भेटवस्तू वाटप*
सिंधुदुर्ग
भाजप दिव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्गच्या वतीने मंगळवार दिनांक 16डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता दिव्यांग बांधवांना भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमामध्ये कसाल व कुंदे गावातील दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे सर व सहसंयोजक प्रकाश वाघ यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.प्रमुख अतिथी म्हणून बाबुराव गावडे,मोहन राणे, सौ.भगत मॅडम,कर्मचारी विशाखा कासले,ललित गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या वतीने भेटवस्तू वाटप करण्यात आले. व योजनांबद्दल माहिती देण्यात आली.या कार्यक्रमाला 30 हून जास्त दिव्यांग उपस्थित होते.उपस्थित दिव्यांग बांधवांना भाजप दिव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्गच्या वतीने उपहार देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित गावडे यांनी केले. विशाखा कासले यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.
